‘माझी कंपनी’ ते ‘आपली कंपनी’ हा बदल स्वीकारणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. सीईओ ते चेअरमन हे स्थित्यंतर मला खूप काही शिकवून गेलं...
हा बदल आहे सीईओच्या भूमिकेपासून ते चेअरमनच्या पदापर्यंतचा. कंपनीचा संस्थापक म्हणून माझ्यासाठी हे खूप कठीण स्थित्यंतर होतं. तब्बल ३० वर्षं मी कंपनीत होतो आणि या काळात बाकी दुसरं काहीच मी केलं नव्हतं. मी स्वत:ला प्रश्न विचारला की, आपली पुढची ३० वर्षं कशी असतील? उत्तर स्पष्ट होतं! केवळ पर्सिस्टंटचा सीईओ म्हणून निश्चित ती भूमिका नव्हती. आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ होती.......